क्रिस्तोफर लक्सन, न्यूझीलंडचे पंतप्रधान
पंतप्रधान म्हणून तुमच्या असामान्य कामगिरीचा मी खूप मोठा प्रशंसक आहे. तुम्हाला माहिती आहेच की, जवळपास 11 वर्षे पंतप्रधानपदाची सूत्रे तुमच्या हाती आहेत, तुम्ही कोविडच्या वादळाचा सामना केला आणि तरीही तुम्ही भारताची अर्थव्यवस्था 50% नी वाढवली. तुम्ही तुमच्या देशातील 250 दशलक्ष नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले असून अत्यंत गरिबी दूर केली आहे. आणि आज, भारत मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषाच्या क्षमतेसह तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. तुमचा देश- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होता आणि या प्रक्रियेत भारताच्या विलक्षण तांत्रिक कर्तृत्वाने जगाचे लक्ष वेधून घेतले.