जीन-मार्क आयरॉल्ट, फ्रेंचचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकास मंत्री
या धाडसी निर्णयामुळे मी प्रभावित झालो आहे. कर चुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांचा बिमोड करण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार यातून दिसून येतो. डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये  झपाट्याने परिवर्तन करून अर्थव्यवस्था आधुनिक करण्याचा उद्देश यामागे आहे. आम्ही बारकाईने या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोत. भारतीय अर्थव्यवस्था उद्योजकांसाठी पर्वणी आहे आणि देशाच्या आर्थिक विकासाला मदत करण्याच्या सरकारच्या निर्धारावर आमचा विश्वास आहे.