जेफ वेनर, मुख्य कार्यकारी अधिकारी,लिंकडीन
तुम्ही जर पहिले तर, आज सर्व घोषणा सरकारी उपक्रमांशी जोडलेल्या आहेत. रोजगार कुशल भारताशी संलग्न आहे,स्टार्टअप पॅकेज स्टार्टअप इंडियाशी सुसंगत आहे. आम्ही भारतीय बाजारपेठेवर लक्ष ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करीत आहेत, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संपूर्ण देशभरातील उद्योगांमध्ये गुंतवणूक होत आहे हे खरच आश्चर्यकारक आहे. स्टार्टअप प्रणाली वेग घेत आहे.तुमच्याकडे लक्षणीय विस्तार असलेल्या ओला आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या आहेत.