जॉन चेंबर्स, कार्यकारी अध्यक्ष, सिस्को
जेव्हा मी पंतप्रधान मोदींबद्दल बोलतो, तेव्हा मी अशा व्यक्तीविषयी बोलत असतो जी दूरगामी विचार करू शकते, ते कसे शक्य होईल याला प्राधान्य देते, जबाबदार अधिकाऱ्यांकडे ते काम सोपवणे, त्यांच्यात निकोप स्पर्धा निर्माण करते, वर्षभरापूर्वी मेक इन इंडिया सारखे परिवर्तन घडवणारे निर्णय घेण्याचे धाडस जो दाखवतो. मी यापूर्वीही म्हटले आहे कि भारत जगभरात धीमा अनुयायी ते अभिनव नेतृत्व असा प्रवास करेल....1.3 अब्ज जनतेची जो काळजी वाहतो आणि ज्याच्याकडे हि समावेशकता आणि वैयक्तिक कौशल्य आहे, त्या महान देशाबरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.