जॉन चेम्बर्स, अध्यक्ष, यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम
“भारताच्या भविष्याबाबत पंतप्रधान मोदी यांचा दृष्टीकोन आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो कसा पोहोचेल याबाबत मी सर्वात जास्त आशावादी आहे असे  म्हटले जाते. USISPF चा अध्यक्ष या नात्याने मला, भारताबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या दृष्टीकोन आणि प्रणालीवर असलेल्या विश्वासाबद्दल भारतीय आणि अमेरिकन सीइओंचे विचार जाणून घेण्याची संधी मिळते. गेल्या चाळीस वर्षांपासून माझ्या भारताशी असलेल्या संबंधांमधला हा सर्वाधिक आहे. मी आज इथे सर्वांना आव्हान देऊ इच्छितो की पुढची पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असामान्य नेतृत्वाखाली आम्ही ‘न्यू इंडिया’ मध्ये कसे योगदान देऊ शकू ते आपण सांगावे.”