झरीन दारूवाला, सीईओ, भारत आणि दक्षिण आशिया विभाग, स्टँडर्ड चार्टर्ड बँक
“FY25 साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प धोरणातील सातत्य दर्शवणारा असून त्यामध्ये मागील सरकारचे मध्यवर्ती तत्व, वित्तीय एकत्रीकरणावरील भर कायम ठेवला आहे. तो वित्तीय विवेक, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च (capex) आणि कर प्रणालीचे सुलभीकरण ही सरकारची मुख्य प्राधान्याची क्षेत्रे असल्याचेही अधोरेखित करतो."