पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी जेव्हा त्यांना बीजिंग, चीनमध्ये सरकारी अधिकारी म्हणून पहिल्यांदा भेटलो होतो, तेहा त्यांची माझ्यावर स्पष्टपणे फार मोठी छाप पडली होती. परराष्ट्र सेवेतील सरकारी अधिकारी या नात्याने मी अनेक आले-गेलेले राजकारणी पाहिले आहेत, पण एक राजकीय नेता म्हणून इतका अभ्यासू, आपल्या जबाबदाऱ्यांकडे इतक्या गांभीर्याने पाहणारा, मनात अनेकविध कल्पना असणारा आणि व्यक्ती म्हणून ज्याच्यात रस वाटावा असा नेता मला कधीच भेटला नव्हता.