डॉ. एस. जयशंकर – भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
दूरदर्शी, रोजगार-केंद्रित आणि विकासाभिमुख केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर केल्याबद्दल FM @nsitharaman जी यांचे अभिनंदन. हा PM @narendramodi यांचे #ViksitBharat चे ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगाने, संरचनात्मक सुधारणा आणि गेल्या 10 वर्षांत केलेल्या परिवर्तनात्मक प्रगतीच्या आधारित असलेला रोड मॅप आहे. #ViksitBharatBudget2025 मध्ये राष्ट्र उभारणीतील मध्यमवर्गाची ऊर्जा आणि योगदानाची दखल घेतली आहे. यातून 'गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी'यांच्या कल्याणाप्रती असलेला आपला दृढ संकल्प आणखी स्पष्ट होतो. कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या महत्त्वाच्या इंजिनांवर लक्ष केंद्रित केल्याने #AtmanirbharBharat उभारणीचे काम आणि जगासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.