डॉ. रशीद अहमद बिन फहाद, राज्यमंत्री, संयुक्त अरब अमिराती
यूएई आणि भारत यांच्यात महान वारशाव्यतिरिक्त  शांतता, प्रेम यांसारखी समान मूल्ये आहेत. दोन्ही देशांचे खूप प्राचीन संबंध आहेत.आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच केलेल्या यूएई दौऱ्यामुळे नवीन संबंधांची कवाडे खुली झाली आहेत. उच्च विकास दरामुळे भारत ही यूएईच्या गुंतवणुकीसाठी अतिशय आकर्षक बाजारपेठांपैकी एक आहे. पायाभूत विकास, ऊर्जा आणि पर्यटन या क्षेत्रांना विकासाच्या दृष्टीने यूएईचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि नजीकच्या काळात अधिक द्विपक्षीय गुंतवणुकीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.