त्शेरिंग तोबगे, भूतानचे पंतप्रधान
तुमच्यामध्ये (पंतप्रधान नरेंद्र मोदी) मला बोधिसत्वांची मंजुश्री, वज्रपाणी, अवलोकितेश्वर ही तीन रुपे दिसतात. तुमच्यामध्ये त्यांचे - शहाणपण, धैर्य आणि करुणा हे गुण अभिव्यक्त होताना दिसतात. भारताची क्षमता पूर्णत्वाने उजेडात आणण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही प्रगल्भ विद्वत्तेसह नेतृत्व करत आहे. तुम्ही धाडसी निर्णय घेऊन आणि आव्हानांना तोंड देत धैर्याने नेतृत्व करत आहात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण नेहमी आपल्या कारभारात आपल्या लोकांचे हित हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून सहानुभूतीने नेतृत्व करत आहात.