“हे बजेट T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील भारताच्या खेळासारखे आहे. अंतिम फेरीपर्यंतचे सर्व सामने आपण जिंकले. आपण सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनलो आणि नंतर फायनलमध्ये थोडे दडपण आले पण सूर्यकुमार यादवने ज्याप्रमाणे अप्रतिम झेल घेऊन आपल्याला विश्वचषक जिंकून दिला तसेच हे आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलासारखा आहे. तो आथिर्क विवेक, पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला पाठबळ आणि उपभोग वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती या अशक्य वाटणाऱ्या तीन गोष्टी साध्य करतो . आथिर्क विवेकबुद्धी, गुंतवणूक आणि उपभोग वाढवणे या तीन अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सूर्यकुमार यादवने घेतल्या अवघड झेलासारख्याच आहेत. मी आशा करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो की हा झेल आपल्याला विकसित भारत बनण्यास मदत करेल.”