पवन कल्याण, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री
कल्याण आणि सुधारणा हातात हात घालून वाटचाल करतात, पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या वतीने आज अर्थमंत्री श्रीमती @nsitharaman यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. कृषी, शेतकरी कल्याण, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, विमान वाहतूक आणि पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये परिवर्तनीय बदलांद्वारे देशाला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प खुबीने तयार केल्याबद्दल मी विशेषत: अर्थमंत्री श्रीमती एम. निर्मला सीतारामन यांचा आभारी आहे. गरिबी कमी करणे, जीवनमान उंचावणे आणि देशाला उज्वल भविष्याकडे नेणे हे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे.