पियुष पांडे
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी पहिली चर्चा झाली जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात पर्यटन विभागासाठी ओ अँड एमची जाहिरात एजन्सी म्हणून निवड झाली होती. त्यांनी वैयक्तिकरित्या मला सगळे समजावले. ते अगदी त्याच्या इतिहासात रमले, त्याची संस्कृती, गिर माउंटन बद्दल, साधुंबदल आणि सिंह आणि माणसांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाबद्दल ते इतके भरभरून बोलत होते की जणू ते शेकडो वर्षांपासून तिथे राहत आहेत ... हे माझ्यासाठी केवळ वरवरचे ज्ञान नव्हते तर तो बुद्धी आणि उत्कटते विषयी एक धडा होता.”