पियुष पांडे
“पर्यटन मोहिमेसाठी मी पहिल्या दिवशी गिरमध्ये चित्रीकरण करत होतो. चित्रीकरण  केल्यानंतर नरेंद्र भाईंनी अमिताभ बच्चन यांना फोन केला आणि नंतर मला देखील फोनवर बोलण्यास सांगितले. मला वाटले त्यांना इतरांसारखेच काही ठराविक प्रश्न विचारायचे असतील “चित्रीकरण कसे, झाले?' परंतु माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही जेव्हा त्यांनी विचारले “माझे लोक तुमची काळजी घेत आहेत ना?” ते म्हणाले, “अमिताभजी देशाची संपत्ती आहे आणि तुम्ही आमची.मी हे शब्द कधीच विसरणार नाही, हे एका उत्तम नेतृत्वाचे उदाहरण आहे.”