प्राध्यापक पॉल मायकेल रोमर, अमेरिकन अर्थतज्ज्ञ
"बरं, भारतातील डिजिटल क्रांती इतकी उद्बोधक ठरण्याचे खरे कारण म्हणजे सरकारने खरोखरच समाजातील सर्व वर्गांना लाभ देण्यासाठी तिचा वापर केला आहे. यामुळे केवळ मूठभर नशीबवान लोकांनाच त्याचे फायदे मिळालेले नाहीत आणि मला वाटते की ही जगातील इतर देशांपेक्षा खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की भारताचे हे यश अद्वितीय असून इतर देशही त्यापासून धडे घेऊ शकतात.