भ्रष्टाचाराच्या मूळ कारणांचे उच्चाटन करण्यासाठी विमुद्रीकरण हे एक योग्य पाऊल आहे. जगामध्ये काळा पैसा खूपच जास्त प्रमाणात पसरला आहे आणि त्याचा वापर दहशतवाद आणि अवैध व्यापारासाठी होत आहे. बेकायदेशीर व्यवहार आणि व्यापाराचे युग आता संपुष्टात आले आहे हा कणखर संदेश संपूर्ण जगाला दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले पाहिजे.