"पंतप्रधान श्री. मोदी हे एक अपवादात्मक नेते आहेत, ज्यांनी अल्प कालावधीत जागतिक मंचावर एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेच्या प्रगतीपथावर नेले आहे. सर्वसमावेशक विकासाचा त्यांचा दृष्टीकोन एका उत्तम भविष्यासाठी आपल्या लाखो लोकांना आशा देतो. 'मेक इन इंडिया', 'डिजिटल इंडिया', 'स्किल इंडिया' यांसारख्या पंतप्रधानांच्या विविध कार्यक्रमांमुळे देश वेगवान व संतुलित आर्थिक व औद्योगिक विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करेल."