बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान
नरेन्द्र, माझ्या प्रिय मित्रा, तुझ्या आजच्या भेटीने मी मनापासून भारावून गेलो आहे. मला राजनैतिक मर्यादा पाळाव्या लागत असल्याने मी या भेटीला कोणताही क्रमांक देणार नाही, अन्यथा मी अडचणीत येईन. पण इस्रायलचा एक महान मित्र, भारत आणि इस्रायलमधील युतीचा खंबीर समर्थक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक महान नेता म्हणून तुझ्या आमच्याकडील या भेटीने मी जितका प्रभावित झालो आहे, तितका पूर्वी कधीही झालो नव्हतो.