बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलचे पंतप्रधान
“वाइब्रंट गुजरात शिखरपरिषद भारताच्या प्रभावशाली आर्थिक वाढीचे  आणि जागतिक     अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड योगदानाचे प्रतिक आहे. ही शिखर परिषद सुरु केल्याबद्दल आणि नव आविष्काराच्या शक्तीने भारताला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याची दूरदृष्टी यासाठी मी माझे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. मी भारतात गुजरातला दिलेली भेट आणि तिथे मिळालेले आदरातिथ्य मी कधीच विसरू शकणार नाही. आज आमच्या दोन्ही देशांत पूर्वीपेक्षा अधिक सहकार्य आहे आणि दोन्ही देशांत अमर्याद संधी आहेत.”