इस्राईलमध्ये स्वागत... मित्रा, तुमचे स्वागत आहे. आम्ही खूप काळ तुमच्या प्रतीक्षेत होतो. आमचे भारतावर प्रेम आहे... संयुक्त राष्ट्रातील आपल्या पहिल्या बैठकीत तुम्ही मला काय सांगितले ते मला आठवतंय.. भारत आणि इस्राईलच्या संबंधांसाठी आकाश ही मर्यादा आहे. परंतु आता,पंतप्रधान, मी इथे नमूद करतो- आपण अंतराळ क्षेत्रातही सहकार्य करत आहोत. तुम्ही एक महान जागतिक नेते आहात... एकत्रितपणे, आपण (भारत-इस्राईल संबंधांसाठी) खूप काही आणि अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो.