पंतप्रधान मोदी, तुमचा 'मेक इन इंडिया' उपक्रम माझ्या 'मेक विथ इंडिया' धोरणाशी मिळताजुळता आहे. उंभय देशांदरम्यान तंत्रज्ञानावरील अधिक सहकार्यासाठी आपण ४० दशलक्ष डॉलर्सचा नाविन्यपूर्ण संशोधन निधी स्थापन करत आहोत. आपली भागीदारी जल, कृषी, सुरक्षा, ऊर्जा आणि अन्य अनेक क्षेत्रापर्यंत विस्तारित आहे. मला वाटते यशाचे सूत्र साधे सरळ आहे: I2 T2. भारतीय बुद्धिमत्ता आणि इस्रायली तंत्रज्ञान यांची सांगड. भविष्यासाठी इस्राईल-भारत संबंध.