जागतिक स्तरावर भारत ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही 120 वर्षांपासून येथे असून 2G पासून 5G पर्यंत झालेल्या स्थित्यंतराचा आम्ही भाग राहिलो आहोत. आज या देशात आमचे 20,000 सहकारी आहेत... जर तुम्ही डिजिटल इंडिया कार्यक्रम बघितला तर त्याची बांधणी कनेक्टिव्हिटीभोवतीच केलेली आहे. 4G ने त्यामध्ये मोठी भूमिका बजावली आणि आता ते 5G मध्ये संक्रमित होत आहे. भारत झपाट्याने डिजिटायझेशन करण्यात सक्षम झाला असूव आम्हाला येथे खूप रोमांचक भविष्य दिसत आहे.