भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे
मी पंतप्रधान मोदींना माझा मोठा भाऊ मानतो. ते मला मार्गदर्शन करतात, म्हणून मी त्यांना माझे गुरू मानतो तसेच त्यांच्यासोबत होणारी प्रत्येक भेट खूप खास असते. यावेळी देखील आम्ही BIMSTEC चा कारभार तसेच BIMSTEC मधील सर्वात मोठा देश, BIMSTEC चे सर्वात मोठे सदस्य राष्ट्र, सर्वाधिक लोकसंख्या असलेला सदस्य, सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि BIMSTEC क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून BIMSTEC मधील भारताच्या नेतृत्त्वाच्या भूमिकेला थोडक्यात स्पर्श केला. आम्ही भारताचे नेतृत्व काय करेल याकडे उत्सुकतने पाहत असतो आणि पंतप्रधान मोदी तसे नेतृत्वाचा करत आले आहेत. त्यामुळे बिमस्टेकला अंतिमतः काहीतरी साध्य करण्यात, त्याची क्षमता काही अंशी दाखवून देण्याच्यादृष्टीने किती चांगल्या गोष्टी आहेत याचा मी उल्लेख केला आहे. -