मनू भाकर, नेमबाज आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती
“मी फक्त 16 वर्षांची होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी मला मोठं ध्येय ठेवण्यासाठी प्रोत्साहित करून मला वैयक्तिक पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांच्याशी झालेल्या संवादावेळी मला बाजूला घेऊन ते म्हणाले, 'तू खूप लहान आहेस. तू आणखी मोठे यश मिळवशील आणि जेव्हा तुला कशाचीही गरज असेल तेव्हा थेट माझ्यापाशी येऊ शकतेस.' त्यांचं हे बोलणं मला फार मोठी प्रेरणा देणारं होतं." “पंतप्रधान मोदींनी मला आत्मविश्वास ठेव आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर असं सांगितलं. त्यांना प्रत्येक खेळाडूबद्दल तपशीलवार माहिती असते.”