मला वाटते भारतीय बाजार चांगला आहे त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुधारणा हाती घेत आहेत. सर्वप्रथम, करविषयक नियम बदलण्यात येत आहेत त्यामुळे ती मोठी गोष्ट आहे. अलिकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेल्या यशामुळे सध्याच्या सुधारणा सुरूच राहतील असा विश्वास जनतेला मिळाला. यामुळे तेजीचे वातावरण आहे, मला चिंता वाटत होती कि विमुद्रीकरणामुळे मोदी दुबळे पडतील, मात्र तसे झाले नाही. त्यातून ते यशस्वीपणे बाहेर आले. मला वाटते तेजी कायम राहील.