मुकेश अंबानी , व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज
नरेंद्रभाई याना जे काही सुचते त्याची ते अंमलबजावणी करतात. महान परिवर्तनवादी नेता म्हणून इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोंद होईल. आधी त्यांनी गुजरातचे परिवर्तन केले आणि आता ते भारताचे ऐतिहासिक परिवर्तन करत आहेत. डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि अन्य उपक्रमांमुळे भारत जगात बलाढ्य आणि सर्वात समृद्ध देश बनेल.