पंतप्रधान मोदींनी माझा उल्लेख करणे, हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, कारण माझ्या देशात ते माझा उल्लेख करत आहेत तसेच माझ्या समुदायाबाबत बोलत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. श्रीलंकेसाठी भारत मोठा भाऊ आहे. आम्हाला भारताची मदत हवी आहे आणि भारत आम्हाला अनेक प्रकारे मदत करु शकतो. सर्वांप्रमाणे आम्हीही पंतप्रधान मोदींवर प्रेम करतो. भारतीयांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक पावले उचलली आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गोष्टी केल्या असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा प्रत्यय निवडणूक काळात येतो. मला वाटते लोकांचे त्यांच्यावर प्रेम आहे.