पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरची बैठक खूपच फलदायी ठरली आणि उभय देशांदरम्यान संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करण्यासाठी हि योग्य संधी आहे. भारताच्या आणि प्रांताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सहायक उत्पादने आणि तंत्रज्ञान पुरवण्यासाठी भारतीय सरकार आणि उद्योग क्षेत्राबरोबर भागीदारी करण्याचा तसेच अमेरिका आणि भारतात आर्थिक लाभ आणि रोजगार निर्मिती करण्याचा लॉकहीड मार्टिनचा चांगला इतिहास आहे.