"केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती आणि कौशल्य, एमएसएमईला आधार देणे, कृषी क्षेत्रातील उत्पादकता सुधारणे, पायाभूत सुविधा गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि शहरी विकास या गोष्टींना योग्य प्राधान्य देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वित्तीय एकत्रीकरणावरील भर कायम ठेवल्याने वित्तीय तुटीचे उद्दीष्ट FY24 मधील GDP च्या 5.6 टक्क्यांवरून FY25 मध्ये 4.9 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे."