राजीव रंजन (लालन) सिंह – केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज मंत्री
माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साजेशा आजच्या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रात विकासाचा वेग वाढवण्यासाठी केलेल्या घोषणा कौतुकास्पद आहेत. बऱ्याच कालावधीनंतर असा उल्लेखनीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. पूर्व भारतात, विशेषत: बिहारमध्ये विकासाचा वेग वाढवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न अनेक ऐतिहासिक घोषणांच्या रुपाने दिसून आले आहे. IIT पटनाचा विस्तार, ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी आणि शेतकऱ्यांसाठी मखाना कौन्सिलची स्थापना यासह इतर विविध उपक्रमांमुळे बिहारच्या विकासाला आणखी गती मिळेल.