लक्ष्य सेन, बॅडमिंटनपटू
“मला खरोखर पंतप्रधान मोदींशी बोलायला खूप आवडतं. मला सांगायचं आहे की जेव्हा मी पॅरिसहून परत आलो तेव्हा मी जी रॅकेट घेऊन खेळलो होतो,ती पंतप्रधान मोदींना देण्यासाठी सोबत नेली होती. माझ्याकडून रॅकेट घेतल्यावर त्यांनी केलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी माझा सिग्नेचर बॅकहँड नो-लूक शॉट खेळायला सुरुवात केली. आणि त्यांनी मला विचारलं की तू असाच शॉट खेळतोस ना. त्यांचं एवढ्या बारकाईनं लक्ष असतं हे पाहून मी थक्क झालो. पंतप्रधान तुमच्या पाठीशी आहेत या जाणीवेनंच खूप छान वाटतं.”