"पंतप्रधानांनाकडे जनसमुदायाशी संवाद साधण्याचे दुर्मिळ कौशल्य आहे. प्रमुख देशांच्या भेटी दरम्यान त्यांनी भारतीय समुदायासोबत ज्याप्रकारे नाळ जोडली आहे ते अभूतपूर्व आहे. त्याचबरोबर विविध देशांच्या अग्रगण्य प्रमुखांबरोबर त्यांचा संवाद आणि त्यांचा राजनैतिक पुढाकार आणि त्यांच्या यशाने त्यांच्या प्रखर टीकाकारांनाही आश्चर्यचकित आणि प्रभावित केले आहे. "