मला दिसत आहे की, भारत हे प्रत्येकासाठी गुंतवणुकीचे केंद्र आहे याची खात्री पटवून देण्यात आपल्या पंतप्रधानांना खरोखरच रस असून त्यांना भारतात व्यवसाय आणि गुंतवणूक करणे सोपे करण्यासाठी ते त्यांचे भारतासोबत नाते निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. आम्ही विशेषत: भरतकाम उद्योगात झालेल्या भारताच्या विकासाबद्दल बोललो. खादीच्या कापडला जागतिक स्तरावर कसे आणता येईल यावरही आम्ही चर्चा केली. ते भारतातील स्वदेशी हस्तकलेला प्रोत्साहन देण्याबद्दल खूप वचनबद्ध असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारे आहेत.