लीना नायर, चॅनेल सीईओ
पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. माझ्या यशाबद्दल त्यांना खूप कौतुक वाटले पण महत्त्वाचे म्हणजे, भारतातून परदेशी जाणाऱ्या महिला आणि मुलींना मी मदत करत रहावे, महिला आणि मुलींनी माझा आदर्श घ्यावा असेही त्यांचे आग्रहाने सांगणे  होते. यावरुन, महिलांनी व्यवसायात आणि इतरही सर्व क्षेत्रात वर यावे आणि स्वतःची प्रगती करावी यासाठी त्यांना विविध मार्गांनी अधिकाधिक मदत करण्याबद्दल त्यांना असलेली आत्मीयता आणि त्यांची बांधीलकी तुम्हाला दिसून येते.