या कार्यक्रमाचे उत्तमरीत्या आयोजन केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचे आभार व्यक्त करतो.
आज जेव्हा मी (महात्मा) गांधींना आदरांजली वाहायला गेलो तेव्हा मी भावूक झालो. माझ्या राजकीय जीवनात गांधींना खूप महत्त्व आहे. मी अहिंसेच्या तत्वाचे पालन करतो.
ब्राझील या आकाराचा कार्यक्रम आयोजित करण्यास सक्षम आहे. चला आपण अधिक चर्चा करून G20 ला लोकप्रिय करूया जेणेकरून त्यामध्ये समाज सहभागी होऊ शकेल.