श्रीमती. रेखा गुप्ता, मुख्यमंत्री, दिल्ली
पंतप्रधान मोदी जी माझ्यादृष्टीने आईसारखे आहेत. ते सगळ्यांची आईसारखी काळजी घेत असतात- ते आपल्याला काय खाल्ले पाहिजे किंवा नाही, पोषण मूल्यांकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून देशातील महिला आणि बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होईल. कधी साऱ्या देशाला ते सांगतात की आहारात तेलाचा वापर कमी करा, लठ्ठपणा कमी करा, मिलेटचा वापर करा, योग आणि व्यायामावर भर द्या असे सांगतात, तेव्हा या सगळ्यातून त्यांचे आईसारखे प्रेम दिसून येते.