श्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
पंतप्रधान मोदींसोबत अनेक दशके काम केल्यामुळे, मला असे वाटले की त्यांचे व्यक्तिमत्त्व एका राजकारण्याच्या पलीकडे आहे - ते राष्ट्राच्या कल्याण हे मिशन समजून त्यासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या नेत्याचे ते मूर्तीमंत रूप आहेत. त्यांच्यादृष्टीने भारताचा उदय आणि भारतीयांचे कल्याण म्हणजे केवळ आदर्श नसून मार्गदर्शक तत्त्वे आहेत.