श्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
समावेशक शासन मॉडेल सुनिश्चित करण्याला कायम प्राधान्य देणारे पंतप्रधान मोदींचे नेतृत्व अद्वितीय ठरते. त्यांच्या धोरणात आणि त्यांच्या अंमलबजावणीत विकासाच्या प्रवासात कोणतीही व्यक्ती किंवा समुदाय मागे राहणार नाही यावर नेहमीच भर असतो. त्यांच्यामते सरकार हे सत्तेचे साधन नसून सेवेचे माध्यम आहे.