श्री अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रातही मोदीजींची रणनीती अद्वितीय आहे. आज जेव्हा ते एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे राहतात आणि आत्मविश्वासाने भारताची भूमिका मांडतात, तेव्हा आपल्या सर्वांमध्ये अभिमान दाटून येतो. पूर्वीच्या काळात भारताकडे बरेचदा उदयोन्मुख राष्ट्र म्हणून पाहिले जात असताना, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक अग्रणी म्हणून भूमिका बजावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.