श्री आर बालसुब्रमण्यम, लेखक
मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान या नात्याने, मोदींनी एक संपूर्ण सरकारी संस्कृती चालविली - सायलो तोडणे, सर्व क्षेत्रांमध्ये मंत्रीपदावरील चर्चेचा आग्रह धरणे आणि फायली इकडून तिकडे सरकवत राहण्याच्या प्रकारांवर उपाय शोधून त्यांनी व्यवस्थेत मार्ग काढला. महामारीच्या काळात "टीम इंडिया" म्हणून सरकार मधील वेगवेगळे स्तर, उद्योग, नागरी समाज आणि नागरिक स्वयंसेवक सरकारचे भागीदार कामाला लागले तेव्हा या नीतीमूल्यांचे दर्शन घडले.