श्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री
सी-प्लेनसाठी दिलेले समर्थन, ज्यामध्ये देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या तरतुदीचा समावेश आहे, हे एक दूरदर्शी पाऊल आहे. यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल, शेवटच्या टोकापर्यंतची आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्था सुधारेल आणि देशातील किनारपट्टी, बेटे आणि दुर्गम भागातील पर्यटन आणि आर्थिक क्षमता वाढण्यास मदत होईल.