श्री. नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार
हा केंद्रीय अर्थसंकल्प सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे. 'विकसित भारत' उभारण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तो सादर करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पुरोगामी आणि दूरदृष्टी असलेला असून, याच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत.