श्री मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
आजचा दिवस 1.45 अब्ज भारतीयांसाठी सणासारखाच दिवस आहे. आपले सर्वात आदरणीय आणि प्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. भारतातील संपूर्ण व्यावसायिक समुदायाच्या वतीने, रिलायन्स परिवार आणि अंबानी कुटुंबाच्या वतीने मी पंतप्रधान मोदीजींना शुभेच्छा व्यक्त करतो. मोदीजींचा अमृत महोत्सव भारताच्या अमृत कालमध्ये येणे हा योगायोग नाही. स्वतंत्र भारताला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हाही मोदीजींच भारताची सेवा करत रहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.