श्री रवींद्र जडेजा, भारतीय क्रिकेटपटू
मी 2010 मध्ये, मोदीजीं गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना पहिल्यांदा भेटलो... मोदीजी आले आणि त्यांनी सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले. मी त्याला पहिल्यांदाच भेटत होतो. आमचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मोदीजी हसले आणि धोनीला म्हणाले, "त्याची काळजी घे.. तो आमचा मुलगा आहे." एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने विशेषत: माझ्या टीमसमोर उच्चारलेल्या साध्या वाक्याने, मला विलक्षण अभिमान आणि आनंद वाटला होता.