श्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री
पंतप्रधान @narendramodi यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विकसित भारताच्या दिशेने भारताचा प्रवास सातत्याने गती घेत आहे. याच भावनेतून, "आकांक्षेचे कर्तृत्वात" आणि "क्षमतेचे कामगिरीत" रूपांतर करू पाहणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी अर्थमंत्री @nsitharaman यांचे अभिनंदन करतो. हा "युवा शक्तीवर आधारित अर्थसंकल्प" पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पनेला अधिक बळकट करेल.