श्री विष्णू साई देव, मुख्यमंत्री, छत्तीसगड
पंतप्रधान मोदींच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होणे वैयक्तिक शिस्त, राजकीय विश्वास आणि राष्ट्रीय परिवर्तनाच्या दुर्मिळ अभिसरणाचे द्योतक आहे. गुजरातमधील वडनगर या छोट्याशा गावातून सुरू झालेली त्यांची जीवनकहाणी भारताच्या आर्थिक विकासाच्या, सामाजिक सुधारणांच्या आणि जागतिक पुनरुत्थानाच्या प्रवासाचा अविभाज्य बनली आहे.