संजय बारू, लेखक आणि धोरण विश्लेषक, माजी संपादक, इकॉनॉमिक टाईम्स, फायनाशीयल एक्स्प्रेस आणि बिजिनेस स्टॅन्डर्ड
“नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी बिजनेस स्टँडर्ड मध्ये संपादक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी आमच्या दोघांमध्ये अर्थपूर्ण चर्चा झाली. जवळपास १ तास झालेल्या या चर्चेमध्ये मोदींनी गुजरातच्या आर्थिक आणि सामाजिक, सर्व मुद्यांवर आणि भविष्यातील सर्व योजनांविषयी सखोल चर्चा केली होती. त्यांची तथ्य आणि आकडेवारी विषयाची माहिती बघून मी खूप प्रभावित झालो होतो. त्यांनी विकासाला प्राधान्य दिले आणि आव्हानांचा सामना केला. २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी जे विकासावर लक्ष केंद्रित केले होते त्याचे मी स्वागत करतो.”