भारताला सेमीकंडक्टर्सचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टिकोनाबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करू इच्छितो. गुजरातमध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा निर्माण करण्यासाठी मायक्रोन वचनबद्ध आहे. गुजरातमधील आमच्या प्रकल्पामुळे जवळपास 5000 थेट नोकऱ्या आणि तेथील स्थानिक समुदायासाठी आणखी 15,000 रोजगार निर्माण होतील, असा आमचा अंदाज आहे.