नेहमीप्रमाणेच पंतप्रधानांसोबत अतिशय उत्तमप्रकारे बैठक झाली. ते भारताचे दूरदर्शी नेते असून भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाच्या प्रगतीसाठी ते समर्पित आहेत. आमच्या साणंद प्रकल्पात आम्ही करत असलेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान मोदींना अवगत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान वाटले. ही बैठक केवळ त्याच कारणासाठी होती, तसेच भारतात सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील कार्यबलात वाढ सुरू ठेवण्यावर मायक्रॉनचा मुख्य भर आहे.