“पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी कोणत्याही देशाला भेट देतात तेव्हा ते तिथे भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेला प्रोत्साहन देत असतात. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा ओदिशातील कलाकार म्हणून, ज्याने भगवान जगन्नाथ यांचे पुरीधाम गाजवले आहे,मला विश्वास आहे की आपले पंतप्रधान देशभरातील प्रतिभावान कलाकारांना प्रेरणा देतील. “स्वच्छ भारत”, “बेटी बचाओ बेटी पढाओ” आदी अभिनव आणि प्रभावी मोहिमांनी सामान्य माणसांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. माझ्या वाळूच्या शिल्पकृतीमधून अनेकदा हा संदेश पसरवण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.”